Saturday, 12 December 2015

रातराणी

नमस्कार मित्रानो,

पर्वा एक जुनी वही सहज चाळताना मीच लिहिलेली एक अर्धवट कविता सापडली. तेंव्हा नेमकं काय झालं होतं आठवत नाही पण हि तेंव्हा पूर्ण नाही होऊ शकली. आज ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय…

रातराणीचा सुगंध मला तुझी आठवण देऊन जातो
तू माझ्या बरोबर आहेस ह्याचा पुरावा देऊन जातो

आपल्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन जातो 
तुलाही माझी आठवण येतचं असेल , हा विश्वास देऊन जातो


खरं सांग … तुलाही माझी आठवण येतंच असेल
आठवतं तुला…  तू अगदी मुक्तपणे सगळा गंध उधळायाचीस माझ्यावर

तुझा तो गंध अजूनही माझ्या प्रत्येक श्वासात ताजा आहे
अगदी आज उमललेल्या रातरानिसाराखाच…

 आणि तु सुद्धा आजही तशीच आहेस …
अगदी आपल्या पहिल्या भेटीत मला भावलेलीस तशी …

Thursday, 7 May 2015

Kavi Kaustubh: माणूस

Kavi Kaustubh: माणूस:

किती वादळांचे मी सोसले तडाखे 

किती पूर नी धरणीकंपही आले 

करा शर्थ तुम्ही मला हरविण्याची 

 जिंकण्याची खोड आता मला लागलेली 

 दमला असाल...

माणूस

७ मे २०१५
नेपाळ मध्ये झालेल्या भूकंपातून वाचलेले बाळ
किती वादळांचे मी सोसले तडाखे 
किती पूर नी धरणीकंपही आले 
करा शर्थ तुम्ही मला हरविण्याची 
जिंकण्याची खोड आता मला लागलेली 
दमला असाल तुम्ही तर बसून घ्या थोडे 
निवांतपणा माझ्या रक्तातच नाही 
उभा राहील पुन्हा मोडिल बंध सारे 
स्वागताला तुमच्या सजवीन पुन्हा सारे




Friday, 6 March 2015

तू ये अशी मिठीत माझ्या

२६ एप्रिल २०१४
तू ये अशी मिठीत माझ्या
विसरून जाशील वेदना साऱ्या
जीवाचं रान करेल मी
तुझं मोत्याचं हसू वेचाया

निसर्ग

६ जुलै २०१३
शब्दं झाले थिटे अक्षरही सापडेना
निसर्गाची किमया मोजाया माप सापडेना
अनंत अशी रूपे त्याची नाना कला त्याच्या ठायी
एवढे असताना देखील गर्व कशाचा नाही

प्रेम

३० मे २०१३
प्रेमाच्या स्पर्षासाठी आसुसलोय मी 
मायेचा पाठीवरून फिरलेला हात 
प्रेयसीचा केसातून फिरलेला हात 
या सगळ्यांना मी पारखा झालो आहे 
मित्रांच्या बाबतीत मात्र मी भाग्यवान आहे 
मित्रांचा सदा खांद्यावर हात आहे

जगणं खूप सोपं असतं

२९ मे २०१३
जगणं खूप सोपं असतं
माणूस अवघड करून ठेवतो
खरं बोलायचं असतं
खरं वागायचं असतं
खरच जगणं खूप सोप्पं असतं

सगळं कसं आपल्या हातात असतं
आज केलेलं काम उद्या फळ देणारंच असतं
फळाची चिंता न करता आपण काम करायचं असतं
कर्माला फळ तर मिळणारच असतं
जगणं खरंच खूप सोप्पं असतं

जगायला पैसा हा हवाच असतो
त्यासाठी जीव झगडावा लागतो
पण म्हणून पैस्यासाठीच जगणं उपयोगाचं नसतं
जगणं खरंच खूप सोप्पं असतं

विद्यार्थ्याने मिळवावे ज्ञान, गृहस्थाने पैसा
संन्यास्याने कळवावा धर्म
न करावे चौर्य कर्म
काम करावे प्रत्येक चोख
न ठेवावा कसूर
जगणे होऊन जाईल सुलभ


Thursday, 5 March 2015

आज कुछ बैचेनिसी है दिल मै

९ फेब २०१२
आज कुछ बैचेनिसी है दिल मै
कुछ नया बनाना है ।
पुराने की चाहत मिटे न मिटे
कुछ नया आजमाना है ।।

ऐ दिल तू यू खफा क्यो है?
कुछ खास बात छुपी तुममे है ।
दिल की बातो को दिल में ही रखना
ये कौनसी समजदारी है।।

ऐ दिल तू अपने दिल के दरवाजे खोल दे
मुझसे थोडी गुफ्तगू करले।
मै वादा करता हू तुझसे
तेरा ये राज मै दिल मे ही रखुंगा
किसी पार भी जाया न होने दुंगा ।।


जिस देश का बचपन भूका है

१९ फेब २०१२
जिस देश का बचपन भूका है
वो देश अभी अधुरा है  ।।धृ ।।

भूक से ही जन्म लेती
गद्दारी और लाचारी है
स्वाभिमान को ग्रहण लगता
यही राहू और केतू है ।।१।।

भूक हो ज्ञान की भूक प्रेम संस्कार की
इस भूक से ही जन्म लेता
एक नया अविष्कार है ।।२।।

आओ हम सब मिलकर
बच्चोकी ये भूक मिटाये
देश को हम पूर्ण बनाये
देश को हम पूर्ण बनाये।।३।।

स्पर्ष

स्पर्ष तुझा स्पर्षून मन गेला
अनंत मुक्या कळ्यांना फुलवून तो गेला
भाव तुझ्या मनीचा मी जाणिला होता
माझ्या मनीचा भाव मात्र, मी हाणीला होता

वळवाचा पाऊस

काही माणसं वळवाच्या
पावसासारखी असतात
आधी खूप सुख देतात
अन नंतर आशा लावून निघून जातात


उद्वाहिका

त्यानं आमच्यावर कृपा केली
अन त्या लिफ्ट मध्ये
फक्त ती आणि मी
लिफ्ट आमची सुरु झाली
त्यानं पुन्हा कृपा केली
अन लिफ्टची आमच्या
लाईट च गेली
ती घाबरली मनातून
अन मी रंगलो स्वप्नांतून
.
.
.
.
.
.
.
.
स्वप्न रंगवता रंगवता
स्वप्नभंगाची स्वप्ने
मला दिसू लागली
मी हिरमुसलेला
तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे
पाहत राहिलो
ती वळली, हसली
अन म्हणाली
येतोयेस ना !
अन माझी कळी खुलली


सखी

झाडाच्या अडून अडून
चांद पहातो चोरून
निळ्याशार त्या पाण्यात
माझ्या सखीचं ते रूप गोजिरवाणं

झाडाच्या अडून अडून 
मग येते ती झुळूक 
मग उठतात तरंग 
निळ्याशार त्या पाण्यात 

झाडाच्या अडून अडून 
चांद होतो लाल रागावून 
मग पुन्हा शांत होते पाणी 
घालण्या हो समजूत चंद्राची 

झाडाच्या अडून अडून 
मग आळवतो कोकीळ 
पुन्हा घालण्या समजूत चंद्राची 

झाडाच्या अडून अडून 
नभातल्या त्या तारका 
मग करतात मत्सर 
माझ्या सखीच्या रूपाचा 

झाडाच्या अडून अडून 
जडे मला थोडा दंभ 
चांद न्यहाळतो जिला 
तिच्या डोळ्यात कौस्तुभ 
तिच्या डोळ्यात कौस्तुभ


भाग्यवान

पावसाचा तो थेंब
किती भाग्यवान होता
जो तुझ्या गालांवरून
तुझ्या ओठांवरून
ओघळत होता
वाऱ्याची ती झुळूक
किती भाग्यवान होती
जी तुझ्या केसांतून
फिरत होती
अन मीही किती
भाग्यवान होतो
हे सगळं होत असतांना
मी तुला पहात होतो

पाऊस असा रुणझुणता

पाऊस असा रुणझुणता
पैंजणे सखीची स्मरली
आठवली तिची गालावरची खळी
अन मनमोहक हास्य
पावसाचा पहिला थेंब
अंगावरी पडला अन
मला स्पर्ष तीचा भासला
पावसात अन तिच्यात
वेगळं असं काहीच नाही
तीही त्याच्यासारखीच
कधी खूप बरसते
तर कधी नुसतीच
झलक देऊन जाते
मग मीही असाच
आस्वाद घेतो
न भेटणाऱ्या तिचा
अन हुलकावणी
देणाऱ्या पावसाचा

मला वेडं म्हणणारं कोणी तरी असावं

ह्या पृथ्वीतलावर मला वेडं म्हणणारं
एक तरी माणूस असावं
माझं बालपण कुठं हरवलं
माझं मलाच कळलं नाही
मला वेडं म्हणणारं कोणी भेटलंच नाही
आयुष्यभर मी माझ्या मुखावर
सामंज्यस्याचा मुखवटा घालून फिरतो आहे
सगळ्यांना समजून सांभाळून घेतो आहे
मला समजावणारं मला सांभाळणारं कोणी तरी असावं
मला वेडं म्हणणारं कोणी तरी असावं 
आत्तापर्यंत सगळे माझ्यावर रुसणारे
सगळे रागावनारेच भेटले
मलाही रुसायला रागवायला
हक्काचं माणूस भेटावं
मला वेडं म्हणणारं कोणी तरी असावं
माझ्यासाठी डोळे भरून येणारं
कोणीतरी असावं
अन माझेच डोळे भरून आले
तर माझे डोळे पुसणारंही कोणी तरी असावं
मला वेडं म्हणणारं कोणी तरी असावं

तारुण्यातालं प्रेम

तारुण्यातालं प्रेम हे असंच असतं
कधी असतं ते फक्तं
शारीरिक आकर्षण
तर कधी असते
प्रचंड भावनिक गुंतागुंत
त्याचं तीच्या साठी अन
तीचं त्याच्या साठी
तीळ तीळ झीजणं
अन रात्रं रात्रं झुरणं
हे चालूच असतं
आणि त्याच वेळी
"आजी सोनियाचा दिनू"
असे म्हणत प्रेमवीरांचा
आवडता "Valentine Day" येतो
तरीही असतो प्रचंड थरार
अगदी भारत - पाकिस्तान
match मधल्या शेवटच्या चेंडूसारखा
प्रचंड साहस करून
तो तीला फुल देतो
तिनं जर स्वीकारलं
तर आनंदी आनंद गडे
अन नाही म्हणाली तर
अत्यंत खिलाडू वृत्तीने
तू नही तो और सही
और नाही तो और सही
असे म्हणत दुसरं फुल
शोधण्यास निघतात

Wednesday, 4 March 2015

हे इवलेसे मन

हे इवलेसे मन, नाही कोणाला मानत
मनाचीच बात मान्य करी ।।
ह्या इवल्याशा मनात, असते प्रचंड ताकद
एका क्षणात सारं, जगं फिरूनिया येई
असा कमालीचा वेग नाही कोणापाशी ।।१।।
ह्या इवल्याशा मनात, असते प्रचंड ताकद
असते जगण्याची उमेद, जगं जिंकण्याचे साहस ।।२।।
ह्या इवल्याशा मनात, असते प्रचंड ताकद
नाही अडता अडत, सदा पुढे जातं राय ।।३।।
ह्या इवल्याशा मनाला असते सवय वाईट
जर मिळे योग्य दिशा, तर तुझ्या सम तूच
अन्यथा तू न कोणाचा, तुझा न कोण ।।३।।