Friday 25 September 2020

तू

माहीत नव्हतं कशी असशील?,

कशी दिसशील?,

कशी रहाशील?,

कशी माणसं जपशील?

पण तू आलीस आणि 

दुधात साखरेनं विरघळावं तसं विरघळलीस

अमृत झालीस, 

सगळे सण वार, व्रतं वैकल्य 

अगदी आनंदानं उत्सहानं पार पाडलीस 

उदबत्तीच्या मंद सुवासात साडी घालून पूजा करताना तुला पाहिलं 

की मी माझा सगळा ताण विसरून जायचो

बायको पेक्षा जास्त मैत्रीण झालीस 

सुखात माझ्या बरोबर,

आणि दुःखात माझ्या मागे आधार म्हणून उभी राहिलीस

घरातल्या प्रत्येकाची मनं जिंकलीस

माझं मन तर केंव्हाच तुझं झालं होतं 

तुझ्या झऱ्यासारख्या खळखळणाऱ्या हसण्यावर,

तुझ्या रम्य अशा डोळ्यांवर,

तुझ्या गुलाबी ओठांवर,

तुझ्या गालांवर,

रेशमी वस्त्रालाही असूया व्हावी अशा मऊ केसांवर,

आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुझ्या निर्मळ आणि स्वच्छ मनावर 

मी प्रेम केलं आणि करत राहील आयुष्याच्या संध्याकाळपर्यंत 

आणि तेंव्हाही तू मला तशीच दिसशील, 

जशी आपल्या पहिल्या भेटीत दिसली होतीस तशी.

 

- कौस्तुभ एकबोटे

Sunday 13 September 2020

अहं ब्रम्हास्मि

मीच तू 

तूच मी 

राम मी 

कृष्ण मी 

आदी मी 

अंत मी 

सूर मी 

ताल मी 

रूप मी 

रंग मी 

राजा मी 

रंक मी 

अणू मी 

रेणू मी 

शेवटचा श्वास मी 

जगण्याची आस मी 

मीच मोह 

मीच माया 

मीच देह 

मीच छाया 

मी मि  नसलेला 

मी फक्त तू असलेला 

 अहं ब्रम्हास्मि

- कौस्तुभ एकबोटे

Wednesday 29 March 2017

उराला भेटले उर, भावनांचा आला पूर
नयनी ओसंडलें नीर, खोल उरात रुजली
आठवण आजच्या दिवसाची

Sunday 24 July 2016

खुशी

जब तुम साथ नही होती,
तो मै मायूस हो जाता हू ।
बारिश आंखो से होती  है,
और मै सुखा रेह जाता हू ।।

Sunday 29 May 2016

Break up

ही चारोळी / कविता एका मित्रासाठी लिहिली होती त्याला तिला पाठवायची म्हणून. पण देवकृपेनं तशी वेळ आली नाही.

वाटलं होतं या वादळाला सामावून घेणारी तूच असशील
पण सोड … तुझी ती ताकद नाही
तू राहा तुझ्या घरट्यात सुखाने
वादळाला तिनक्यांची तमा नाही

--
कौस्तुभ

Saturday 12 December 2015

रातराणी

नमस्कार मित्रानो,

पर्वा एक जुनी वही सहज चाळताना मीच लिहिलेली एक अर्धवट कविता सापडली. तेंव्हा नेमकं काय झालं होतं आठवत नाही पण हि तेंव्हा पूर्ण नाही होऊ शकली. आज ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय…

रातराणीचा सुगंध मला तुझी आठवण देऊन जातो
तू माझ्या बरोबर आहेस ह्याचा पुरावा देऊन जातो

आपल्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन जातो 
तुलाही माझी आठवण येतचं असेल , हा विश्वास देऊन जातो


खरं सांग … तुलाही माझी आठवण येतंच असेल
आठवतं तुला…  तू अगदी मुक्तपणे सगळा गंध उधळायाचीस माझ्यावर

तुझा तो गंध अजूनही माझ्या प्रत्येक श्वासात ताजा आहे
अगदी आज उमललेल्या रातरानिसाराखाच…

 आणि तु सुद्धा आजही तशीच आहेस …
अगदी आपल्या पहिल्या भेटीत मला भावलेलीस तशी …

Thursday 7 May 2015

Kavi Kaustubh: माणूस

Kavi Kaustubh: माणूस:

किती वादळांचे मी सोसले तडाखे 

किती पूर नी धरणीकंपही आले 

करा शर्थ तुम्ही मला हरविण्याची 

 जिंकण्याची खोड आता मला लागलेली 

 दमला असाल...